पक्षिणी प्रभातीं चारियासी जाये । पिलूं वाट पाहे उपवासी ॥१॥ तैसें माझें मन धरी वो तुझी आस । चरण रात्रंदिवस चिंतीतसे ॥२॥ तान्हें वत्स घरीं बांधलेंसे देवा । तया हृदयीं धांवा माउलीचा ॥३॥ नामा ह्मणे देवा तूं माझा सोईरा । झणीं मज न अव्हेरा अनाथनाथा ॥४॥