पानापानांत दिसतो कान्हा
पानापानांत दिसतो कान्हा फुले तोडू कशी मी सांगा ना? गोकुळीचा हा कृष्णकन्हैया हा गोपींचा बन्सी बजैय्या या राधेचा भूलभुलैय्या कशी सावरू मी भोळ्या मना मी धरू जाता, येई न हाता वळुनी हसतो लपताछपता बावरुनी मी हळूच बघता झाडामागून करतो खुणा बासुरीच्या या सूरांत न्हाली चिंब राधिका भिजुनी ओली कृष्णरूप ही छाया झाली आता सरला परकेपणा