पंढरीची वारी जयाचिये कुळीं । त्याची पायधुळी लागो मज ॥१॥ तेणें त्रिभुवनीं होईन सरता । नलगे पुरुषार्था मुक्ति चारी ॥२॥ नामाची आवडी प्रेमाचा जिव्हाळा । क्षण जीवावेगळा न करीं त्यांसी ॥३॥ नामा ह्मणे माझा सोयरा-जिवलग । सदा पांडुरंग तया जवळीं ॥४॥