पांडुरंग त्राता पांडुरंग दाता
पांडुरंग त्राता : पांडुरंग दाता अंतींचा नियंता पांडुरंग दयेचा सागर : मायेचें आगर आनंदाचें घर पांडुरंग भक्तीचा ओलावा : दृष्टीचा दिष्टावा श्रद्धेचा विसावा पांडुरंग तप्तांचें चंदन : दीप्तांचें इंधन प्रकाशवर्धन पांडुरंग अंगसंगें त्याच्या झालो मी निःसंग देहींचा साष्टांग पांडुरंग