पनघट कटिवर उभी एकटी
पनघट कटिवर उभी एकटी मोहक बांधा कसा मदन मनावर काल पाहिला- हा तर रतिचा ठसा संगमरवरी पुष्करणीच्या चांदण्यातल्या कारंज्यावर रूपरसाचा कुणी ओतला रेखिव पुतळा असा मदन मनावर काल पाहिला- हा तर रतिचा ठसा या शुभ्र साडीच्या पट्टीची भरजर डोळ्याला सलते काळी चोळी क्षणभर का अंधाराची चंद्राला झालर असे वाटते उन्हात पडला चंद्राचा कवडसा मदन मनावर काल पाहिला- हा तर रतिचा ठसा