पंख हवे मज पोलादाचे शूर लढाऊ जटायुचे सीतेपरी जो हरण करोनी असह्य अबला नेईल कोणी काळझेप ती तिथे घालुनी शील रक्षण्या स्त्रीजातीचे निज जननीला मुक्त कराया गरुड मागता अमृत देवा तुच्छे हासता इंद्र तेधवा वज्र तोडण्या त्या इंद्राचे गर्भपिलांना सागर गिळता क्रोधे उठली पक्षिण टिटवी जळा पेटवी, सागर आटवी अगस्तीच्या सामर्थ्याचे