पंख जेधवां फुटतील
पंख जेधवां फुटतील तेव्हा निर्भय तुम्ही व्हावे आणि उद्याचे स्वप्न सुखाचे दिशांतुनी रेखावे अंधारातून अडले पाऊल मुक्त करा, घ्या नवीन चाहूल जा झेपावत दहा दिशांना क्षितिज दूर पळावे अपुल्या पंखांमधली शक्ती नको कुणाची त्यावर सक्ती वादळातही मन हे तुमचे विचलित मुळी ना व्हावे दिशाहीन ते नका भिरभिरू मोह शोधण्या नकाच विहरू या मातीचे या फांदीचे, स्मरण संगती न्यावे