पाण्या तुझा रंग कसा
पाण्या तुझा रंग कसा? ज्याला जसा हवा तसा ! चांदराती चंद्रापरी काळ्या राती कृष्णापरी या रे कुणी तीरी बसा ज्याचा त्याला दिसेल ठसा ! पाण्या तुझा गंध कसा? मेळ ज्यासी घडे तसा ! फेका तरी हार ताजा मोगर्याचा वास माझा चंदनाने चंदनसा गंधकाने गंधकसा ! पाण्या तुझा स्वाद कसा? ज्याला जसा हवा तसा ! साखरेने गोड करा द्राक्षरसे मधुर जरा अमृताने अमृतसा विषासवे विष जसा ! येती किती, जाती किती त्याची मला नाही भीती वाहतसे नित्य असा कुणी हसा, कुणी रुसा !