परब्रह्म निष्काम तो हा गौळियां घरीं । वाक्या वाळे अंदु कृष्ण नवनीत चोरी ॥१॥ ह्मणती गौळणी हरीचीं पाउलें धरा । रांगत रांगत येतो हरी हा राजमंदिरा ॥२॥ लपतछपत येतो हरी हा राजभुवनीं । नंदासी टाकूनि आपण बैसे सिंहासनीं ॥३॥ सांपडला देव्हारीं यासी बांधी दाव्यांनीं । शंख चक्र गदा पद्म शारंगपाणी ॥४॥ बहुता पुण्यें बहुता कष्टें जोडलों देवा । अनंत पवाडे तुमचे न कळती मावा ॥५॥ नामा ह्मणे केशवा अहोजी तुह्मी दातारा । जन्मोजन्मीं द्यावी तुमची चरणसेवा ॥६॥