परम सुवासिक पुष्पें कोणी चातुर्यें गुंफिति नारी । सुगंध तैलें वासित करिती शय्यावस्त्रें धरुनि करीं । नानापरीचे विडे मनोहर तबकांमध्यें कोणी भरी । अंगराग ते तयार करुनी ठेविति शेजेशेजारीं । खिडक्यांचे वाळ्याचे पडदे भिजवुनि कोणी गार करी । गुलाबपाणी थंड करोनी शिंपित कोणी गच्चिवरी । सर्व तयारी नीट कराया दक्ष असति जन किती तरी । वाटे मज मंदिर हें करिलचि वैकुंठाची बरोबरी ॥