परदेशी सजण घरीं आले देहताप सरले : सुखमय मी मंगल गीत म्हणालें मोर जसा घनगर्जन श्रवुनी तैसी उन्मन झालें प्रभुमीलन होतांच क्षणीं त्या सारें दु:ख गळालें चंद्र बघुनि जशि फुले कुमुदिनी तैसी फुलुनी गेलें नसानसांत भरे शीतलता : महालांत हरि आले सगळ्या भक्तांचे कैवारी ते प्रभुचरण मिळाले मीरा विरहिणि शीतल झाली : द्वंद्वच पार निमालें