परीकथेतील राजकुमारा स्वप्नी माझ्या येशिल का? भाव दाटले मनी अनामिक, साद तयांना देशिल का? या डोळ्यांचे गूढ इशारे शब्दांवाचुन जाणुन सारे 'राणी अपुली' मला म्हणोनी तुझियासंगे नेशिल का? मूर्त मनोरम मनी रेखिली दिवसा रात्री नित्य देखिली त्या रूपाची साक्ष जिवाला प्रत्यक्षातुन देशिल का? लाजुन डोळे लवविन खाली नवख्या गाली येईल लाली फुलापरी ही तनू कापरी हृदयापाशी घेशील का? लाजबावरी मिटुन पापणी साठवीन ते चित्र लोचनी नवरंगी त्या चित्रामधले स्वप्नच माझे होशील का?