पाठमोरी मूर्ति तव ही पाहिली मीं कौतुकें वाटलें त्वत्कुंतलीं गे गुंतलीं सारीं सुखें. भार त्यांचा गाढ काळा मेघ आषाढांतला का फुलांच्या मार्दवें मानेवरी भारावला? हा न झेला गे फुलांचा- लाजरी सौदामिनी वाकुनीं केशीं तुझ्या लोकां खुणावी हासुनी. पाठमोरी तू बिजेची रात्र, लावण्यें रमा हासुनी पाहीं वळोनि, होउं दे ना पौर्णिमा.