मी अशी होऊन वेडी पत्र पहिले वाचते सावळे ग रूप त्यांचे नयनी माझ्या खेळते मोतियांच्या अक्षरांच्या दिव्यमाला शोभती लाजरे ग नेत्र त्यांचे मधुनी दिसती, हासती ओळी ओळीतील त्यांचे भाव भोळे जाणते पत्र पहिले वाचते पारिजाताचा तयांचा स्पर्श मजला आठवे स्पर्शसौगंधा तयांनी धाडिले पत्रासवे मी अबोली होउनिया सारखी ग लाजते पत्र पहिले वाचते लाजते मी, दूर जरी ते येथुनी मी बोलते हे निळे ग गूज त्यांचे हृदयी माझ्या कोरते गीत उमले ओठी माझ्या, गाली हासू दाटते पत्र पहिले वाचते