वाट दंवानं भिजून गेली उन्हं दारात सोन्याची झाली मायभवानी पावनी आली पावनेर ग मायेला करू ओटी आईची मोत्यानं भरू ! माय अंबिका माय भवानी रूपदेखणी गुणाची खाणी शंभूराजाची लाडकी राणी माझी पायरी लागे उतरू ओटी आईची मोत्यानं भरू ! सुखी नांदते संसारी बाई न्हाई मागणं आणिक काई काळी पोत ही जन्माची देई तूच सांभाळ आई लेकरू ओटी आईची मोत्यानं भरू !