फू बाई फू, फुगडी फू दमलास काय माझ्या गोविंदा तू आत पोकळ, बाहेर पोकळ डोंबार्याचा वेळू म्हतारपणी नवरा केला तोही पोरखेळू माय-लेकी गोष्टी सांगे त्यांची प्रीत मोठी लुगडं सोडून देऊ लागली जावयाच्यासाठी नवी नवी नवरी तवा शेवरीवाणी लाजं आता झाली चिली-पिल्लं कोंबडीवाणी झुंजं काजळ ल्याली, कुंकु ल्याली, टिकली दावी लोका देवाजीचा संग नाही रंग झाला फिका संतांची निंदा केली, निंदा नाही बरी तुकाराम शरण गेले सद्गुरू पायी