फुलव पिसारा मोरा
फुलव पिसारा मोरा, श्रावण येतो आहे ! उंच स्वराने वारा 'स्वागत' गातो आहे ! तू धरणीचा मानसभाव सहजनृत्य हा तुझा स्वभाव आजवरीच्या उच्छवासांचा सौरभ होतो आहे ! थेंब कशाचे? जलवर्षाव तृप्तीमाजी बुडेल गाव वसुंधरेचा प्रियकर वेगे दौडत येतो आहे ! लवते वेली, हलते झाड विजयाआधी धुंद कवाड संघनृत्यी या उडते माती, गुलाल होतो आहे !