पिर पिर पिर पिर पावसाची त्रेधा-तिरपिट सगळ्यांची ! रस्त्यावर मोटारगाड्यांची शर्यत लागली पोहायची बाबांना ऑफिसची घाई फार छत्रीला त्यांच्या लागली धार फजिती झाली कपड्यांची ! ताईच्या साडीवर परीटघडी चिखलाची सुंदर उठली खडी दादाच्या रेनकोटचा भलताच थाट पावसाने उसवली त्याची पाठ भंबेरी उडाली फॅशनची ! कुणीतरी सांगा हो काही उपाय गुरुजींचा चिखलात फसलाय पाय शाळेला सुट्टी पडली उगाच घरात बसायचा माझ्यामागे जाच संधी हुकली भिजायची