पिवळी पिवळी हळद लागली
पिवळी पिवळी हळद लागली भरला हिरवा चुडा वधु लाजरी झालीस तू ग सांगे तो चौघडा ! बाजुबंद त्या गोठपाटल्या बिलवर नक्षीदार तुझ्या हृदी ग कुणी छेडिली रतिवीणेची तार सांग कुणी ग अंगठीत या तांबुस दिधला खडा ! मुंडावळी या भाळी दिसती काजळ नयनांगणी करकमळापरी कुणी गुंफिले सुवासिनीचे मणी आठवणींचा घेउन जा तू माहेराचा घडा ! स्वप्नफुलांसह रमत रहा तू प्रेमळ संसारी भाग्यवेल ती मोहरेल ग उद्या तुझ्या दारी सौख्य पाहता भिजु दे माझ्या डोळ्यांच्या या कडा !