Back
Fitting…

1 page

प्रभाती सूर नभी रंगती

प्रभाती सूर नभी रंगती, दशदिशा भूपाळी म्हणती

पानोपानी अमृत शिंपित
उषा हासरी हसते धुंदित
जागी होऊन फुले सुगंधित तालावर डोलती

कृषीवलांची हाक ऐकुनी
मोट धावते शेतामधुनी
पक्षी अपुल्या मधुर स्वरांनी, स्वरांत स्वर मिळविती

प्रसन्‍न वदनी सुहासिनी कुणी
सडे शिंपिती मृदुल करांनी
श्रीविष्णूचे नाम स्मरुनी तार कुणी छेडिती