प्रभु या हो
प्रभु या हो, प्रभु या हो अष्टभाव-सुमनांची माझ्या मंगलपूजा घ्या हो पतित पराजित जीवन माझे पेलवे न हे अपार ओझे करांगुलीने भार उतरवा पैलतिरी मज न्या हो त्रिविध ताप मज अतीव छळिती लवहि न शांती, लवहि न तृप्ती करुणेच्या मज शीतल धारा पाजुनि थारा द्या हो मीपण माझे प्रभुजी हरवा चरणी द्यावा नित्य विसावा चिदानंद बहरवा, फुलावा आनंदाचा लाहो