PrintSource

प्राचीवरी ये भास्कर

Prachivari Ye Bhaskar

प्राचीवरी ये भास्कर
अंध होई अंधकार
सृष्टीच्या या नाट्यकृतीचा होई सुरू नवा प्रहर

तिमिराचा हा सरे प्रवेश
तारांगणे होती उदास
लपवी मज म्हणे भूपास लज्जित हा सुधाकर

पूर्व दिशा ही नटली-सजली
वसुंधरा ही आतुर झाली
तरुशाखेवर वृक्षवेलींना येई नवा नवा बहर