PrintSource

प्रतिमा उरी धरोनी

Pratima Uri Dharoni

द. वि. केसकर

प्रतिमा उरी धरोनी मी प्रीतिगीत गावे

ते गीत प्रीतिचे रे हळूवार मी म्हणावे
अस्फुट भावनांच्या स्वप्‍नात गुंग व्हावे

पुष्पात गंध जैसा, गीतात भाव तैसा
अद्वैत प्रीतिचे हे मम जीवनी असावे

तू सप्तरंग धनुचे, स्वर सात बासरीचे
संगीत जीवनाचे अळवीत मी बसावे

का रोहिणीस वाटे चंद्रासवे असावे
हे भावस्वप्‍न अपुरे साकार तू करावे