प्रत्येकाची रात्र थोडी आतून आतून वेडी प्रत्येकाच्या पायामध्ये एक तरी बेडी ! प्रत्येकाच्या मनातून कुठला तरी राग प्रत्येकाच्या चंद्रावर कसला तरी डाग प्रत्येकाच्या मनातून काहीतरी खोडी ! प्रत्येकाच्या मनामध्ये स्वप्नातला देश प्रत्येकाच्या तळव्याला नशिबाची रेष प्रत्येकाची छाती करे रोज तडजोडी ! फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी प्रत्येकाच्या पानी कशी रोज खाडाखोडी?