प्रीत रंगली ग
प्रीत रंगली ग कशी राजहंसी अग बाई ग लाजली हंसी, बोले ना ती तुझ्याशी ! तुझिया कपोली प्रीत रंगली ग लाजून हसली, बघ इकडे ग धरिसी कशाला पदर उराशी तुझी रे हंसी, फसली कैसी, पडली पाशी, धीट किती हा रमण विलासी, बोले ना तुझ्याशी ! रुसली राणी, डोळां पाणी, हास्य आननी नजर तुझी घे थरथरणारी वरती जराशी गोड बोलुनी, प्रेम दावुनी, हृदय जिंकुनी, जाल सोडुनी, कुठे दूर देशी, बोले ना तुझ्याशी !