प्रीतफुले माझी सोनेरी सोनेरी ! रुमझुम ओठांत येती लकेरी माझ्या घरी मी आले फिरून कणाकणामधून रातराणी फुलून मला मनोमनी वाटे घर माझे ग, माझे ! प्रीतफुले माझी सोनेरी सोनेरी ! हे माझे घर, जागे नवी भावना ओढ लागे नवी गोड संवेदना आज माझ्या मना स्वर्ग वाटे उणा स्वर्ग माझा मला भेटला भूवरी प्रीतफुले माझी सोनेरी सोनेरी ! ये चाहूल नवी, कोण ये जीवनी? कोण छेडीतसे ही नवी रागिणी? कंप गात्रांतुनी, गीत मौनातुनी सूर झंकारती प्राणवीणेवरी ! प्रीतफुले माझी सोनेरी !