PrintSource

प्रीतीविना सुकुनी जाई

Preetivina Sukuni Jai

वि. स. खांडेकर

प्रीतीविना सुकुनी जाई राया जीवीची उषा
भासे, दूर नसे रे निशा, निमाल्या आशा

गुंफियले ना गंधफुला
कंटका भ्याले, मुकले तुला
कशा पिशापरी घोर दिशा

प्रीतीच्या का मंगल होमी
एक न समिधा वाहिली मी
मूक वीणेपरी माझी दशा