प्रेम करुन मी चुकले
मलाही मुकले तुलाही मुकले प्रेम करून मी चुकले मीच लाविल्या वेलीवरचे मृदुलदलांचे मधुगंधाचे फुलता फुलता मम प्रणयाचे फूल अचानक सुकले धार प्रवाही संगमी तुटली उगमापासुन सरिता आटली पाण्याविण ह्या डोहाभवती मृगजळ घेरून बसले दोन पाखरे मिळुनी रमता एकावरती घाव बसता सुखात दुसरे इतुके कळता व्याकुळ लोचन हसले