PrintSource

प्रेमात तुझ्या मी पडले

Premat Tujhya Mi Padale

ग. दि. माडगूळकर

कळले नाही केव्हा घडले
प्रेमात तुझ्या मी पडले

भेट एकदा ती ओझरती
क्षण संभाषण ओळख नुसती
परि परतता पाऊल अडले !

कुठेच माझे मन लागेना
तहान त्याची लव भागेना
अबोध काही वेडच जडले !

उगा वाटते तुज भेटावे
तुझे मनोगत तुलाच ठावे
संभ्रमात मी अर्धी बुडले !