प्रिया आज माझी नसे साथ
प्रिया आज माझी नसे साथ द्याया नको धुंद वारे, नको चांदण्या या नको पारिजाता धरा भूषवू ही पदांची तिच्या आज चाहूल नाही प्रियेवीण आरास जाईल वाया फुले सान झेलू तरी भार होतो पुढे वाट साधी तरी तोल जातो कुणाला कळाव्या मनाच्या व्यथा या न शांती जिवाला न प्राणास धीर कसा आज कंठात येईल सूर उरी वेदना मात्र जागेल गाया अता आठवीता तशा चांदराती उरे मौक्तिकावीण शिंपाच हाती उशाला उभी ती जुनी स्वप्नमाया