पुनवेचा चंद्रम आला घरी चांदाची किरणं दर्यावरी चांदण्याच्या चुर्यात खार्याखार्या वार्यात तुझामाझा एकान्त रे, साजणा ! लाटांचे गीत निळे काठाला ते गूज कळे सागरकाठा भिडती लाटा श्वासाला त्या श्वास जुळे निळ्यानिळ्या पाण्यात एका खुळ्या गाण्यात तुझामाझा एकान्त रे, साजणा ! चंदेरी धुंद हवा साथीला तूच हवा थरथरणारा एक शहारा या रात्रीचा रंग नवा लाजर्या या गालांत हृदयाच्या तालात तुझामाझा एकान्त रे, साजणा !