पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव प्रभातीच येशी सारा जागवीत गाव विधाता जगाचा तूचि उधळीत आशा उजळिशी येतायेता सभोवती जग दिशा रथ तुझा सोनियाचा धावे भरधाव अंधारास प्रभा तुझी गिळे प्रभाकर दिवसा तू ज्ञानदीप लावी दिवाकर सृष्टीला या चैतन्याचा तुझा पेहराव पुष्पपत्रदानाची रे तुला नसे आस तूच चालुनिया येशी माझिया घरास भक्ताठायी गुंतलासे तुझा भक्तिभाव