टाकिलेस नाव जरी आठवीन मी तुला जाळिलेस पंख तरी झेप घ्यायची मला तो प्रशांत सांध्यमेळ प्रीतिचा सुरम्य खेळ जपिन तोच क्षण सुवर्ण मधुर संगतीतला प्रीतिकथा घडलेली जाणतात वनवेली शोक-अंत वाचुनिया आसमंत स्फुंदला चुकवशील जागेपणि म्हणशिल जा जा इथुनी स्वप्नभेट परि कशी चुकेल रे तुला मला