Back
Fitting…

1 page

तळपते विक्रम सौदामिनी

अभिमन्यूच्या रथी फडकते
रणी ध्वजा आरुणी
तळपते विक्रम सौदामिनी

घोर प्रभंजन घुसळी सागर
तसे भडकले भीषण संगर
कंपित धरणी, कंपित अंबर
भैरवसा त्या रणी भासतो
बाल रथी आर्जुनी
तळपते विक्रम सौदामिनी

चक्रव्यूह तो द्वार मृत्यूचे
कराल मुख जणू भीषणतेचे
आत उभे रथ धनुर्धरांचे
चाल करी त्या मतंग ज्यावर
बाल सिंह गर्जुनी
तळपते विक्रम सौदामिनी

पांडवसेना विजयी होऊन
पुढे निघाली व्यूहा भेदून
निघे वाहिनी पहाड फोडून
घन तिमिराच्या राशी नाशीत
बाल रवि अग्रणी
तळपते विक्रम सौदामिनी

सरले पुढती द्रोण जयद्रथ
शल्य भोज कृप कर्ण महारथ
अभिमन्यू हो रणी भग्‍न-रथ
तरी तयाचे कौतुक तरळे
द्रोणांच्या लोचनी
तळपते विक्रम सौदामिनी

अखेर झाला शांत प्रभंजन
गिरिशिखरांचे करुनी मर्दन
अनल शमे हा अरण्य जाळून
विक्रम गाथा गाऊन विरली
शौर्याची रागिणी
लुप्त हो तळपून सौदामिनी

तळपते विक्रम सौदामिनी

अभिमन्यूच्या रथी फडकते
रणी ध्वजा आरुणी
तळपते विक्रम सौदामिनी

घोर प्रभंजन घुसळी सागर
तसे भडकले भीषण संगर
कंपित धरणी, कंपित अंबर
भैरवसा त्या रणी भासतो
बाल रथी आर्जुनी
तळपते विक्रम सौदामिनी

चक्रव्यूह तो द्वार मृत्यूचे
कराल मुख जणू भीषणतेचे
आत उभे रथ धनुर्धरांचे
चाल करी त्या मतंग ज्यावर
बाल सिंह गर्जुनी
तळपते विक्रम सौदामिनी

पांडवसेना विजयी होऊन
पुढे निघाली व्यूहा भेदून
निघे वाहिनी पहाड फोडून
घन तिमिराच्या राशी नाशीत
बाल रवि अग्रणी
तळपते विक्रम सौदामिनी

सरले पुढती द्रोण जयद्रथ
शल्य भोज कृप कर्ण महारथ
अभिमन्यू हो रणी भग्‍न-रथ
तरी तयाचे कौतुक तरळे
द्रोणांच्या लोचनी
तळपते विक्रम सौदामिनी

अखेर झाला शांत प्रभंजन
गिरिशिखरांचे करुनी मर्दन
अनल शमे हा अरण्य जाळून
विक्रम गाथा गाऊन विरली
शौर्याची रागिणी
लुप्त हो तळपून सौदामिनी

तळपते विक्रम सौदामिनी

अभिमन्यूच्या रथी फडकते
रणी ध्वजा आरुणी
तळपते विक्रम सौदामिनी

घोर प्रभंजन घुसळी सागर
तसे भडकले भीषण संगर
कंपित धरणी, कंपित अंबर
भैरवसा त्या रणी भासतो
बाल रथी आर्जुनी
तळपते विक्रम सौदामिनी

चक्रव्यूह तो द्वार मृत्यूचे
कराल मुख जणू भीषणतेचे
आत उभे रथ धनुर्धरांचे
चाल करी त्या मतंग ज्यावर
बाल सिंह गर्जुनी
तळपते विक्रम सौदामिनी

पांडवसेना विजयी होऊन
पुढे निघाली व्यूहा भेदून
निघे वाहिनी पहाड फोडून
घन तिमिराच्या राशी नाशीत
बाल रवि अग्रणी
तळपते विक्रम सौदामिनी

सरले पुढती द्रोण जयद्रथ
शल्य भोज कृप कर्ण महारथ
अभिमन्यू हो रणी भग्‍न-रथ
तरी तयाचे कौतुक तरळे
द्रोणांच्या लोचनी
तळपते विक्रम सौदामिनी

अखेर झाला शांत प्रभंजन
गिरिशिखरांचे करुनी मर्दन
अनल शमे हा अरण्य जाळून
विक्रम गाथा गाऊन विरली
शौर्याची रागिणी
लुप्त हो तळपून सौदामिनी