तांबुस गोरा हात साजिरा
तांबुस गोरा हात साजिरा मुठीत मोती लाख सजणी, टाक बियाणं टाक ! बंड्या बैलाला हो हो हो हो माझ्या बैलाला हो एका सकाळी फूट कोवळी काळ्यांत हिरवी झांक ! नाजुक लवलव तशीच वाढव खुरपून हरळी पाक ! हिरव्या रानी, मंजुळ गाणी गात पाखरे राख ! सजणी टाक बियाणं टाक ! पाखरांची राखण नजरेची गोफण घरच्या चोराला धाक ! पिकलेल्या मळ्यांत, रास मोज खळ्यांत ओट्यात पुण्याई टाक ! चांदण्यांत बसून, माझ्यासंगं हसून, कष्टाची गोडी चाख ! सजणी, टाक बियाणं टाक !