तांडा चालला रे गड्या
तांडा चालला रे गड्या तांडा चालला आज हितं उद्या तिथं खेळ नवा मांडला एक गाव सोडुनी दुसरं गाव जोडूया मुशाफिरी वसती ही घडोघडी मोडूया संसाराचा डोलारा पाठीवरी बांधला वनवासी जिणं हे जल्माला लागलं दु:खाचं काटंकुटं ठाई ठाई पेरलं कधी सरंल वाट ही ठावं नाही कुणाला हिरवळीचा बिछाना, धुक्याची रे वाकळ रात कधी संपली, कधी झाली सकाळ माकडीच्या माळाला झेंडा आज रोविला