टप् टप् पडती अंगावरती प्राजक्ताची फुले भिर् भिर् भिर् भिर् त्या तालावर गाणे अमुचे जुळे ! कुरणावरती, झाडांखाली ऊन-सावली विणते जाळी येतो वारा पाहा भरारा, गवत खुशीने डुले ! दूर दूर हे सूर वाहती उन्हात पिवळ्या पहा नाहती हसते धरती, फांदीवरती हा झोपाळा झुले ! गाणे अमुचे झुळझुळ वारा गाणे अमुचे लुकलुक तारा पाऊस वारा मोरपिसारा, या गाण्यातुन फुले ! फुलांसारखे सर्व फुला रे सुरांत मिसळुनि सूर चला रे गाणे गाती तेच शहाणे, बाकी सारे खुळे !