टप् टप् टप् काय बाहेर वाजतंय् ते पाहू चल् ग आई, चल् ग आई, पावसात जाऊ ! भिरभिरभिर अंगणात बघ वारे नाचतात ! गरगर गरगर त्यासंगे चल गिरक्या घेऊ ! आकाशी गडगडते, म्हातारी का दळते? गडड्गुडुम गडड्गुडुम ऐकत गे राहू ! ह्या गारा सटासटा आल्या चटाचटा पट् पट् पट् वेचुनिया ओंजळीत घेऊ ! फेर गुंगुनी धरू, भोवर्यापरी फिरू "ये पावसा, घे पैसा", गीत गोड गाऊ ! पहा फुले, लता-तरू, चिमणी, गाय-वासरू चिंब भिजती, मीच तरी का घरात राहू?