तव भास अंतरा झाला, मन रमतां, मोहना हासतीं फुले भवताली मधुर ये फळावर लाली स्मितसाम्य तुझ्या अधरींचें मम खिळवी लोचना ! वाहत ये झुळझुळ वारा दरवळला परिमळ सारा तव हृदयपुष्पगंधाची अनुभवितें कल्पना !