तव नयनाचें दल हललें ग
तव नयनाचें दल हललें ग ! पानावरच्या दंवबिंदूपरि त्रिभुवन हें डळमळलें ग ! तारे गळले, वारे ढळले दिग्गज पंचाननसे वळले गिरि ढांसळले, सुर कोसळले ऋषि, मुनि, योगी चळले ग ! ऋतुचक्राचे आंस उडाले आभाळातुन शब्द निघाले, "आवर आवर अपुले भाले मीन जळीं तळमळले ग !" हृदयीं माझ्या चकमक झडली नजर तुझी धरणीला भिडली दो हृदयांची किमया घडली पुनरपि जग सावरलें ग !