Back
Fitting…

1 page

ते गीत कोकिळे गा

ते गीत कोकिळे गा पुन्हापुन्हा
लुब्ध तुझ्या गाण्याला मुग्ध भावना

तुझ्या गाण्याचे ऐकुन सूर
नदीनाल्यांस येती पूर
जललहरींतुनी प्रीत ये धावुनी
तरूवेलीस येई कल्पना

सप्तसूरांत होऊन दंग
विश्व गाण्यात होई गुंग
दंवबिंदूंतुनी गीत ये रंगुनी
सूर तालास देई चालना

तुझ्या कंठातले अमृताचे
गीत आहे तुझे मोलाचे
गोड गाण्यातले सूर हे आगळे
धुंद जिवास देई प्रेरणा

ते गीत कोकिळे गा

ते गीत कोकिळे गा पुन्हापुन्हा
लुब्ध तुझ्या गाण्याला मुग्ध भावना

तुझ्या गाण्याचे ऐकुन सूर
नदीनाल्यांस येती पूर
जललहरींतुनी प्रीत ये धावुनी
तरूवेलीस येई कल्पना

सप्तसूरांत होऊन दंग
विश्व गाण्यात होई गुंग
दंवबिंदूंतुनी गीत ये रंगुनी
सूर तालास देई चालना

तुझ्या कंठातले अमृताचे
गीत आहे तुझे मोलाचे
गोड गाण्यातले सूर हे आगळे
धुंद जिवास देई प्रेरणा

ते गीत कोकिळे गा

ते गीत कोकिळे गा पुन्हापुन्हा
लुब्ध तुझ्या गाण्याला मुग्ध भावना

तुझ्या गाण्याचे ऐकुन सूर
नदीनाल्यांस येती पूर
जललहरींतुनी प्रीत ये धावुनी
तरूवेलीस येई कल्पना

सप्तसूरांत होऊन दंग
विश्व गाण्यात होई गुंग
दंवबिंदूंतुनी गीत ये रंगुनी
सूर तालास देई चालना

तुझ्या कंठातले अमृताचे
गीत आहे तुझे मोलाचे
गोड गाण्यातले सूर हे आगळे
धुंद जिवास देई प्रेरणा