ते नयन बोलले काहीतरी
ते नयन बोलले काहीतरी मी खुळी हासले खुळ्यापरी निळ्या नभापरी किंचित निळसर नयन बोलके आणिक सुंदर बघताबघता मीही क्षणभर झाले ग बावरी क्षण माझे मज मलाच नकळे वसंत नयनी कधी दरवळे तनुकोमल या वेलीवरले फूल फुले अंतरी मला हवे जे अतिमोहक ते कसे अचानक जुळुनी येते सांगाया मज लाज वाटते संभ्रमांत क्षणभरी