PrintSource

तेजोमया हे चिन्मया

Tejomaya He Chinmaya

मंगेश पाडगांवकर

तेजोमया हे चिन्मया
उजळून या तिमिरात या

नैराश्य हे जावो दुरी
नवचेतना उगवो उरी
विकसून या कुसुमांत या

किराणांमध्ये बुडू दे मला
मनमोकळे उडू दे मला
विहगांपरी गगनात या

ज्योतिर्मया सृष्टी नवी
बघण्यास द्या दृष्टी नवी
नव सूर्य व्हा हृदयात या