थंडगार ही हवा त्यात धुंद गारवा अशा सुरेख संगमी जवळ तू मला हवा ! निळ्या नभात चालली दूर दूर पाखरे दूर ना जरी तुझ्या जीव अंतरी झुरे अंतरात बोलतो अबोल प्रीत पारवा संथ या जलाशयी गात गान कमलिनी हळूच लाजता मनी फुलत राग-रागिणी गंध त्यात चंदनी, स्वरांत येई गोडवा फूल प्रीतीचे कुणा अनामिकास वाहते मुग्धता परि मना नवेच काही सांगते अशा सुरम्य संभ्रमी भास आगळा नवा