थोराहुनही थोर श्रीहरी
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे थोराहुनही थोर श्रीहरी गोकुळचा चोर सकल सुरांना वंदनीय हा असुरांना शिरजोर चंद्रवदन तो देवकीनंदन राधेचा चित्चोर देखुनी ज्यातें प्रमोदित होती भाविक नेत्र-चकोर मृदू अधरांवर मुरली सुस्वर तरीही श्रीधर समर धुरंधर जरी लोण्याहून मऊ तरीही वज्राहून कठोर