राधा रमणी मोहन हरिणी, चाले चपळ चरणी ठुमकत आल्या किती गौळणी आले नेसून काळी चंद्रकळा सोळा शिणगार आले घालून गळा घडा लाजेचा डोईवर डुचमळला अन् भिजली तनू देखणी आली चंद्रावळ मी नखर्याची लाल पैठण जरीच्या पदराची जशी रंभा अप्सरा इंद्राची उभी धरणीच्या अंगणी नको कान्हा अशी ही बळजोरी मथुरेच्या जाऊ दे बाजारी दिस बुडताना येईन माघारी तुज पुरवीन मी मागणी