ती पाहतांच बाला
ती पाहतांच बाला, कलिजा खलास झाला, छातींत इष्कभाला, कीं आरपार गेला ! स्वर्गांतल्या पर्यांना, की वस्त्रगाळ करुनी, कमनीय देह विधिनें, रचिला तिचा छबेला? लावण्य काय सारें, उकळोनि वा पिळोनी, त्या मस्त अत्तराचा भरला गमेचि बुधला ! डौलांत चालतां ती, हत्ती वनांत झुरती रस्त्यांत गुंड जमती, तिज अन् पहावयाला