PrintSource

तो सलीम राजपुत्र

To Salim Rajputra Nartaki

अनिल भारती

प्रीतीची आसवें पत्थरांत पाझरली
तो सलीम राजपुत्र, नर्तकी अनारकली

अनोळखी शिपाईगड्या एकदाच पाहिले
शूराच्या चरणावर मस्त हुस्‍न वाहिले
इष्काच्या दरबारी चांदरात बरसली

बंड करुन उठली तलवार सलीमाची
राजनिष्ठ राजबीज आस मोंगलांची
अकबरच्या न्यायकसोटीस प्रीत उतरली

ते शराबी नैंन कधी कुणा नाही डरले
राजा वा रयतेला ना कधीच घाबरले
मीलनाच्या वाटेवर भिंत जरी बांधली

अल्लाच्या दरबारी दोन पाखरें जुळी
पंख मिटून मूकपणे चढली एका सुळी
तो पतंग ती शमा एकसाथ जाळली