PrintSource

तू अनश्वरातील अमरेश्वर

Tu Anashwarateel

गुरुनाथ शेणई

तू अनश्वरातील अमरेश्वर अविनाशी
मज देशील का तू दर्शन दिव्य प्रकाशी

तू चिरंतनातील ईश्वर असशिल का रे
हे दोन घडीचे वैभव नश्वर सारे
बरसती तुझ्यावर नक्षत्रांच्या राशी

गाईली किती मी तव करुणामय गाणी
दाटला गळा मग नयनी उरले पाणी
तू मंगल प्रतिभा ब्रह्मतेज आकाशी

का तुला न यावी करुणा माझी देवा
तू केवळ माझ्या सर्वस्वाचा ठेवा
दे मला आसरा तुझिया चरणापाशी