तू दूर दूर तेथे, हुरहुर मात्र येथे विरहात रात्र मोठी प्रेमीजनास वाटे शब्दात सांगू कैसे ते दुःख अंतरीचे ओलावले दंवात हे काठ पापण्यांचे भरला स्वरांत कंप, कंपात भाव दाटे मी भाबडी मनाची आहेच स्वप्नवेडी विरुनी तुझ्यात जावे ही एक आस वेडी राहो अभंग प्रीती, राहो अभंग नाते भाळावरी असे हे सौभाग्य लाल कुंकू विक्राळ काळ येता दोघे तयास जिंकू स्फुरता मनात आशा ओठांत गीत येते